दौंडच्या तरुणांची मुंबई ते पश्चिम बंगाल सायकल संदेश यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:51+5:302021-08-15T04:13:51+5:30
भारताचे पश्चिम टोक मुंबई गेट वे ऑफ इंडियापासून उद्या १५ ऑगस्ट रोजी प्रवास सुरू करणार असून पूर्व टोक ...
भारताचे पश्चिम टोक मुंबई गेट वे ऑफ इंडियापासून उद्या १५ ऑगस्ट रोजी प्रवास सुरू करणार असून पूर्व टोक पश्चिम बंगाल येथे बंगालच्या उपसागरापर्यंत ते ३१ ऑगस्टपर्यंत सुमारे २१०० किलोमीटर सायकल प्रवास करणार आहेत. या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा त्यांचा मानस आहे.
या सायकल प्रवासात ते व्यसनमुक्त जीवन-चिंतामुक्त जीवन, सायकल चालवा-प्रदूषण टाळा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवा असा संदेश देऊन प्रवासादरम्यान गावोगावी, शहरांमध्ये देऊन जनजागृती करणार आहेत.
जयकुमार जावळे यांनी यापूर्वी अनेक वेळा सायकलिंग करून १५ हजार किमीपर्यंत प्रवास करून पाणी वाचवा, बेटी बचाव-बेटी पढाओ असे संदेश दिले आहेत. राजेंद्र कदम यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांनीही १० हजार किमी सायकलचा प्रवास करून व्यसनमुक्तीपर प्रबोधन करून संदेश यात्रा केली आहे. राजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र कदम आणि जयकुमार जावळे यांचा सन्मान करून प्रवासाला शुभेच्छा दिल्या. या वेळी सरपंच प्रवीण लोंढे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, मुकेश गुणवरे, नवनाथ लोंढे, अरुण भोई, बापूराव चोपडे, दीपक गायकवाड, योगेश वाघमारे, तानाजी थोरात आणि ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
राजेगाव (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र कदम आणि जयकुमार जावळे यांचा सन्मान करून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.