दौंडच्या प्लाझ्मादान चळवळीने १८५ रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:31+5:302021-05-17T04:09:31+5:30
कोरोना संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातच प्लाझ्माची नवी समस्या सर्वत्र भेडसावत आहे. एक सामाजिक बांधिलकी जपत लोकोशेड ...
कोरोना संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातच प्लाझ्माची नवी समस्या सर्वत्र भेडसावत आहे. एक सामाजिक बांधिलकी जपत लोकोशेड श्री हनुमान सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता परदेशी यांनी प्लाझ्मादान चळवळ राबवण्याचे नियोजन केले. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली. फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मादान केला. या चळवळीमुळे महाराष्ट्रासह कर्नाटकात १८५ रुग्णांना प्लाझ्मा देऊन जीवदान देण्यात आले आहे. दरम्यान, ५१ जणांनी प्लाझ्मा दानासाठी अँटिबॉडी तपासणीसाठी दिले आहे.
लोकोशेड श्री हनुमान सेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला स्वराज्य नागरी पतसंस्था, समीर राजोपाध्ये, दिनेश फराटे, अनिकेत वैद्य,निखील शिंदे, श्यामसुंदर सोनोने, कुणाल मंत्री, राहुल निमजे, राहुल जाधव, मयूर ओझा, नितीन वाघ, मुकेश ठकवाणी, विशेष परमार, सरिता गौड, सचिन परदेशी, अनुराधा पवार यांचे सहकार्य मिळत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची गरज भासू लागली आहे. पण, त्या प्रमाणात ते उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना प्लाझ्मा मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळेच आम्ही प्लाझ्मादान चळवळ राबविली. जेणेकरून त्यांना मदत होईल. या चळवळीच्या माध्यमातून शक्य तेवढी सेवा करण्याचा मानस आहे.
प्रवीण परदेशी
१६ दौंड प्लाझ्मा
धन्वंतरीची पूजा करत प्लाझ्मादान चळवळीचा शुभारंभ करताना मान्यवर.