कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दावडी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:53+5:302021-04-21T04:09:53+5:30
तालुक्यातील पूर्व भागातील दावडी, निमगाव या परिसरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. ...
तालुक्यातील पूर्व भागातील दावडी, निमगाव या परिसरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. दावडी गावातील लोकसंख्या दहा हजारांवर आहे. ४ दिवसांपूर्वी एकाच घरातील दोन मायलेकरांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. तसेच वडील व मुलाचा मुत्यू झाल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरण करण्यात आलेले आहे. १o४१ नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. गावातील उर्वरित ४५ वयाच्यावरील लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावत सॅनिटायजरची फवारणी करण्यात येणार आहे. गावातील संपूर्ण लोकांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. गावातील माझे गाव माझे कुटुंब या योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच संभाजी घारे व उपसरपंच राहुल कदम यांनी दिली. गाव ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असून फक्त दवाखाने, अत्यावश्यक दुकाने चालू राहणार आहे. गावातील अंतर्गत रस्ते बंद केलेले आहे. या वेळी दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, तलाठी सतीश शेळके, ग्रामसेवक तानाजी इसवे, ग्रामपंचायत सदस्य, संतोष सातपुते, अनिल नेटके, रमेश होरे, माजी उपसरपंच हिरामण खेसे, मारुती बोत्रे, ग्रामपंचायत कर्मचारी नीलेश शिंदे, कोतवाल देवेंद्र ओव्हाळ, उपस्थित होते.
दावडी गावाच्या लोकसंख्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्रांची इमारत मंजूर आहे. पण ही मंजुरी अजून कागदावरच आहे. गावात शासकीय दवाखना नसल्याने गरीब नागरिकांचे उपचाराउभावी हाल होत आहे. मंजूर इमारतीचे काम आता सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
संभाजी घारे, सरपंच दावडी.
दावडी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव बंद करण्यात आले आहे.