कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोरचे प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:40+5:302021-03-27T04:12:40+5:30

उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशासकीय बैठकीत लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. यात भोर तालुक्यातील ६० ...

Dawn administration ready to prevent the outbreak of corona | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोरचे प्रशासन सज्ज

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोरचे प्रशासन सज्ज

Next

उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशासकीय बैठकीत लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. यात भोर तालुक्यातील ६० वर्षांवरील वयोगटातील ९ हजार ५३० नागरीकांना आज अखेर लस देण्यात आली असून यात उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील ४ हजार ३४२ जणांचा तर ग्रामिण भागातील पाच प्राथमिक आरोग्य केंदावरील लसीकरण मोहिमेत ५ हजार १८८ जणांना लस देण्यात आल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील ६० वर्षांवरील व ४५ वयोगटातील एकूण ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असुन यासाठी गांवनिहाय नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय भोर येथे नागरीकांना कोरोनाला मज्जाव करणारी लस देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली असुन नागरीकांना त्यांचे घरापासून लसीकरण केंद्रावर ने आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे अत्यावश्यक असेला त्यावेळी ग्रामपंचायती मार्फतही व्यवस्था करण्याच्या सुचना ग्रामसेवकांना देण्यात असल्याचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगीतले.

--

चौकट

भोर तालुक्यात लसिकरण मोहिमेला १६ जानेवारी पासून सुरुवात झाली असली तरी सुरुवातीला नागरीकांचा कमी प्रतिसाद होता. अशा वेळी उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्यात ५१५ आरोग्य कर्मचार्यांना, फेब्रुवारी महिनयात एचसीडब्यु ४५३, तहसीलमधील ८९,नगरपालिका ७६,पोलिस आणि होमगार्ड १७७, पंचायत समितीच्या ४७३ कर्मचाऱ्यांना तर मार्च मध्ये एचसीडब्युच्या ४६४, तहसिलमधील १०९, नगर पालिकेतील ६१, पोलिस व होमगार्ड ८१, व पंचायत समितीमधील ७३७ जणांना तर ६० वर्षावरील ९८१ जणांना लस देण्यात आली आहे

Web Title: Dawn administration ready to prevent the outbreak of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.