‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 09:37 PM2019-10-21T21:37:48+5:302019-10-21T21:42:58+5:30

यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे.

The dawn of 'Swarachaitanya' will Sunday on 27th October | ‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

Next
ठळक मुद्देयुवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत व डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे.

पुणे :  भारतीय अभिजात संगीतामध्ये  सृजनशीलतेची कास धरताना  नाट्यसंगीतातूनही ’कानसेनांना’ तृप्तीची अनुभूती देणारा प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे,  ‘जोहार मायबाप’ सारख्या स्वरांमधून अभिजात गायकीचे दर्शन घडविणारी प्रथितयश गायिका मंजुषा पाटील आणि मधुर स्वरांमधून रसिकमनाचा ठाव घेणारी युवा गायिका सावनी रविंद्र यांच्या  सुरेल अविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट संस्मरणीय ठरणार आहे.  युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ.  सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने रविवारी (दि 27 ऑक्टोबरला) पहाटे साडेपाचला चिंचवड येथील शिवाजी उदय मित्र मंडळ मैदानात  ही स्वरमैफल सजणार आहे. 
गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. अनुभवा सप्त स्वरांचा अनोखा साक्षात्कार. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट  पाहत असतात. यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संवादीनीवर अभिषेक शिनकर, ऑर्गन राजीव परांजपे, तबला निखिल फाटक, पखवाज ओंकार दळवी, तालवाद्य आदित्य आपटे, निवेदन आनंद देशमुख यांचे आहे. या तिन्ही गायकांनी संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. 
या कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे काका हलवाई स्वीट सेंटर, खत्री बंधू पॉट आईस्कीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट, उर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा सह्योगी प्रायोजक आहेत. तसेच धीरेंद्र अँडव्हरटायझिंग हे  कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर आहेत. 
...........

रांका ज्वेलर्स व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. यांच्या सहयोगाने उपक्रम

* ‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवार (21 क्टोबर) खालील केंद्रावर मिळतील
* लोकमत पिंपरी विभागीय कार्यालय, विशाल ई-स्क्वेअर बिल्डिंग, पिंपरी
* काका हलवाई स्वीट सेंटर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर, चिंचवड
* रांका ज्वेलर्स, चिंचवड
* खत्री बंधू  पॉट आईस्क्रीम आणि मस्तानी पिंपरी.
..............
* कार्यक्रम स्थळ   
शिवाजी उदय मित्र मंडळ मैदान, चिंचवड 
दिनांक : 27 आॅक्टोबर 
वेळ : पहाटे ५.३० वाजता
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक
..........

Web Title: The dawn of 'Swarachaitanya' will Sunday on 27th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.