बुधवार ठरला अपघाताचा दिवस

By admin | Published: February 12, 2015 02:31 AM2015-02-12T02:31:53+5:302015-02-12T02:31:53+5:30

देहूरोड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर ७ जण जखमी झाले. एका अपघातातील दोन जण तर दुसऱ्या

Day of the accident took place Wednesday | बुधवार ठरला अपघाताचा दिवस

बुधवार ठरला अपघाताचा दिवस

Next

देहूरोड : देहूरोड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर ७ जण जखमी झाले. एका अपघातातील दोन जण तर दुसऱ्या अपघातातील एकजण गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर निगडी आणि देहूरोड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत अलकापुरीजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झालातर कॅन्टोन्मेंट जकात नाक्याजवळ दुपारी पावणेतीनच्या सुमारास दुसरा अपघात झाला.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलकापुरी जवळील अपघातात कार्तिक बाळकृष्ण नाडर (वय १९, रा. बापदेवनगर, किवळे) हा तरूण ठार झाला. त्याच्या समवेत दुचाकीवर असलेले हर्ष राजेंद्र प्रसादसिंग (वय १९, रा. बापदेवनगर, किवळे) आणि कृष्णदेव पतोडी (वय १८, रा. बापदेवनगर, किवळे) हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले.
पुणे बाजुकडे निघालेला ट्रेलर (एचआर ५५ एच ४३६७) आणि दुचाकी (एमएच १४ एजे ३६६१) यांच्यात हा अपघात झाला. हर्ष, कृष्णदेव आणि कार्तिक हे तिघे मित्र देहूरोडहून पुणे बाजुकडे निघाले होते. महामार्ग दोन पदरी असतानाही ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज तपासी अंमलदार विनोद शिंदे यांनी वर्तविला.
अपघातानंतर ट्रेलर चालक घाबरून पळून गेला. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात स्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकी ट्रेलर खाली गेल्याने अपघाताची भिषणता तीव्र होती. अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविले. मात्र, जखमींपैकी कार्तिक या जबद जखमीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुचाकीचा चुराडा झाला. तर ट्रेलर पोलिसांनी ताब्यात घेतला
आहे. कार्यकर्ते विलास शिंदे,
राजू पवार यांनी अपघाताबाबत कळविले.(वार्ताहर)

Web Title: Day of the accident took place Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.