दिवस अपघातांचा
By admin | Published: February 16, 2015 04:30 AM2015-02-16T04:30:14+5:302015-02-16T04:30:14+5:30
बारामती-इंदापूर रस्त्यावर भवानीनगर नजिक शेरपूल येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दूध वाहतूक टँकर पलटी झाला.
काटेवाडी : बारामती-इंदापूर रस्त्यावर भवानीनगर नजिक शेरपूल येथे समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दूध वाहतूक टँकर पलटी झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
बारामती-इंदापूर हा रस्ता भवानीनगरच्या शेरपूल येथे अरूंद परंतु, अधिक उतार असलेला रस्ता आहे. त्या रस्त्यावरून इंदापूरच्या बाजुने डायनामिक्स डेअरीला दूध पोहच करण्यासाठी अजय फराटे यांचा टँकर (क्रमांक एमएच ११/एम ६७८७) बारामतीकडे निघाला होता. शेरपूल येथे उतारावर समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात दोन चार पलटी खात आडवा झाला. त्यामुळे टँकर चालक कदम व सुपरवायझर महारनवर दोघेही कॅबिनमध्ये अडकले. शेरापूलानजिकचे व्यावसायिक स्वप्नील जगताप, आप्पा टकले, डॉ. राकेश मेहता, महेश दळवी, सोहेल बेंग, अभिजित जगताप, अशोक निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)