भोरला दिवसाआड पाणी

By admin | Published: March 28, 2016 03:16 AM2016-03-28T03:16:07+5:302016-03-28T03:16:07+5:30

भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी सिमेंटची पाइपलाइन दोन ठिकाणी फुटल्याने आठवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे.

Day after day | भोरला दिवसाआड पाणी

भोरला दिवसाआड पाणी

Next

भोर : भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी सिमेंटची पाइपलाइन दोन ठिकाणी फुटल्याने आठवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे.
भाटघर धरणाखाली जॅकवेल काढून भोर शहरासाठी १९९२ साली सुमारे ४ किलोमीटरची सिमेंट पाइपलाइन व ५० एचपी पंप असलेली पहिली पाणीपुरवठा योजना करण्यात आली होती. मात्र, सदरचे पाणी कमी पडत असल्याने सन २००८ साली नगरपालिकेने डी.आय. पाइपलाइन व ९० एचपींचा पंप, पाणी साठवण टाक्या अशी दुसरी नळपाणीपुरवठा योजना करण्यात आली होती.
जुनी पाइपलाइन सिमेंटची असल्याने वारंवार फुटते, पंप नादुरुस्त होतात, केबल जळतात यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. गेल्या आठ दिवसांपासून भोलावडे व भोर शहरातील पोस्ट कार्यालयाजवळ पाइपलाइन फुटल्याने नवीन लाइनवरून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, सदरचे पाणी शहराला पुरत नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. फिल्टरचे काम काही प्रमाणात अपूर्ण असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे.यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
श्रीपतीनगर, गणेशपेठ, शिवापूर आळी येथे दोन वर्षांपूर्वी नवीन डी.आय. पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, पाणीपुरवठाच सुरू नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा वीज नसेल तर पाणीच भरता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेकडून पाइपलाइन कशासाठी टाकण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पाच ठिकाणी डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर कामाची मुदत संपली तरीही काम पूर्ण झाले नाही. (वार्ताहर)

पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, फिल्टरचेही काम
पूर्ण झाल्याने दोन दिवसांत शहराला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.
- चंद्रकांत सागळे, नगराध्यक्ष,
भोर नगरपालिका

Web Title: Day after day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.