बारामती शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 19:35 IST2024-06-26T19:34:17+5:302024-06-26T19:35:27+5:30
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली....

बारामती शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
बारामती : निरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाले असून, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पर्यायाने पाणीपुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे. याबाबत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली.
२७ जून रोजी संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणीपुरवठा होईल. तर शुक्रवारी (दि.२८) पाणीपुरवठा होणार नाही. अशाप्रकारे निरा डाव्या कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, याची सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी . तसेच पाण्याचा जपून वापर करावा. नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.