पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद
By Admin | Published: November 16, 2014 12:29 AM2014-11-16T00:29:59+5:302014-11-16T00:29:59+5:30
नगर रस्त्यावर पालिकेने लाखो रुपये खर्च करून बसविलेले दिवे काही बंद आहेत, तर काही दिवस-रात्र सुरू असतात. नगर रस्ता क्षेत्रीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे.
चंदननगर : नगर रस्त्यावर पालिकेने लाखो रुपये खर्च करून बसविलेले दिवे काही बंद आहेत, तर काही दिवस-रात्र सुरू असतात. नगर रस्ता क्षेत्रीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे.
ही समस्या कधी सुटणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सुरू कधी होणार, याचे उत्तर अधिका:यांकडे नाही.
गेल्या चार-पाच महिन्यापासून रामवाडी पासून ते दर्गा व दग्र्यापासून ते रामवाडी या ठिकाणी नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवे बसविण्यात आले आहेत.
मात्र, ते केवळ दहाबारा दिवस सुरू झाले, नंतर मात्र ते बंद पडले ते सुरू झाले नाहीत. (वार्ताहर)
4नगर रस्त्यावर दग्र्यापासून पुण्याच्या दिशेला जाणा:या रस्त्यावरील काही दिवे बंद असतात. तसेच, बायपास चौकात बसविण्यात आलेल्या दिव्यातील केवळ एकच दिवा चालू असतो. बाकी सर्व बंद असतात.
4टाटागार्ड रूमपासून ते विमाननगर या ठिकाणचे दिवे रात्रंदिवस सुरूच असतात. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी झोप घेण्याचे सोंग घेतात. त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त आहेत.वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर या भागातील अंतर्गत रस्त्यांवरील दिवेही गेल्या महिन्यापासून बंद आहेत.
4नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयात अनेकवेळा तक्रारी केल्या; मात्र अधिकारी दाद देत नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
3 खुळेवाडीत जाणा:या रस्त्यावर, खुळेवाडी रस्त्यापासून ते बायपास या रस्त्यावरील पदपथावर रात्रीच्या वेळी महिला मोठय़ा प्रमाणात चालण्यासाठी येत असतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पथदिवे या ठिकाणचे बंद असल्याने, महिला या ठिकाणाहून चालण्यास घाबरत आहेत.