महाविद्यालयांत ‘डे’जचा माहौल
By Admin | Published: February 6, 2016 01:30 AM2016-02-06T01:30:25+5:302016-02-06T01:30:25+5:30
फेब्रुवारी महिना आला की, महाविद्यालयांत उत्साहाचे वातावरण दिसू लागते. साधारणपणे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयात ‘डे’ज साजरे केले जातात
पिंपरी : फेब्रुवारी महिना आला की, महाविद्यालयांत उत्साहाचे वातावरण दिसू लागते. साधारणपणे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयात ‘डे’ज साजरे केले जातात. तरुण-तरुणींसाठी हा एक उत्सवच असतो. अगोदरच्या दिवशी कोणता दिवस साजरा करायचा याचे नियोजन केलेले असते. त्यानुसार तरुण-तरुणी विशिष्ट पेहराव करतात. काही पारंपरिक पेहरावाचे महाविद्यालयांत खास आकर्षण असते. त्यासाठी सध्या महाविद्यालयांतील तरुण-तरु णींची धावपळ सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
महविद्यालयांत मुलांनी आर्मी डे, साऊथ इंडियन ड्रेस, धोतर-कुर्ता, तर मुलींनी काश्मिरी, राजस्थानी डे, नऊवारी साडीचे अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे.
चॉकलेट डे, ब्लॅक डे, आॅड डे, घोस्ट डे, ट्रॅडिशनल डे, सारी-धोती डे, क्वीन्स डे, थीम डे, रोज डे आदी विविध डेज महाविद्यालयांत साजरे केले जात आहेत.
डेज साजरे केले जात असले, तरी तरुणींतून ‘सारी डे’लाच जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या विविध महाविद्यालयांतून दिसून येत आहे. नऊवारी की, काठपदरी साडी यात काठपदरी साडी परिधान करण्यावरच तरुणींचा भर असल्याचे दिसून येते.
तसेच वेगवेगळ्या फॅशनच्या साड्या घालण्याकडे कल आहे. तर तरुणांत मिस-मॅच डेबाबत अधिक उत्सुकता आहे. थीम डेची तयारी विद्यार्थ्यांत सुरू आहे. भुताचे पात्र, कार्टून, बिझनेस गेट अप, पर्यावरण अशा विविध थीम सादर केल्या जातात. टॅ्रडिशनल डेला कोण अस्सल गावठी पोशाखात येणार व कोण काय करणार याच्या प्लॅनिंगच्या गप्पा क ॉलेज कट्ट्यावर रंगत आहेत. डेजमध्ये सर्वच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. (प्रतिनिधी)गटागटाने सेल्फी काढण्यावर तरुण-तरुणींचा अधिक भर असतो. एकाच वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता येत असल्याने तरुणांत सेल्फीची मोठी क्रेझ आहे. महाविद्यालयांत साजऱ्या होणाऱ्या डेला महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांबरोबर परदेशी विद्यार्थ्यांतही उत्सुकता असते. परदेशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीय संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. संस्कृतीनुसार पेहराव करण्यास विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीही डेजमध्ये सहभाग नोंदवतात.
- प्रा. संध्या लिगाडे, डी. वाय. पाटील.
कॉलेज आॅफ अप्लाइड आटर््स अॅण्ड क्राफ्ट, आकुर्डी
महाविद्यालयात विद्यार्थी गटाने विविध डेज साजरे करतात. विद्यार्थ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी डेज साजरे करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून विद्यार्थी एकमेकांत मिसळतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. नेतृत्वगुण विकसित होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. असे उपक्रम महाविद्यालयांत साजरे होण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. एस. एल. गायकवाड, शिक्षक