बारामती| माळेगावात भरदिवसा घरफोडी; पावणे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:03 IST2022-02-23T15:56:19+5:302022-02-23T16:03:26+5:30
पुणे येथून फिंगरप्रिंट टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे...

बारामती| माळेगावात भरदिवसा घरफोडी; पावणे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरीला
माळेगाव (पुणे): भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना अमरसिंह कॉलनी माळेगाव येथे दि. २२ रोजी दुपारी दोन ते साडेआठ दरम्यान घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले ( वय-३० वर्षे, फ्लॅट नं. ७ झगडे रेसिडेन्सी अमरसिंह कॉलनी माळेगाव ता. बारामती ) हे फ्लॅट बंद करून नातेवाईकांच्या कार्यक्रमाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम सात हजार रुपयांसह नऊ लाख रुपयांचे दागिने चोरले. या चोरीचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.
दरम्यान सदर घरफोडीची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या. तसेच पुणे येथून फिंगरप्रिंट टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे. सदर चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
आपला शेजारी खरा पहारेकरी या उक्तीचा वापर करावा. बाहेर गावी जाताना शेजारच्यांना सांगावे, अनोळखी व्यक्तीची माहिती पोलिसांना द्यावी. अडचणीच्या वेळी ११२ या नंबरवर संपर्क केला पाहिजे.
-गणेश इंगळे (उपविभागीय पोलिस अधिकारी)