डीसीसी बँकेचा व्याजदर कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:24+5:302021-07-18T04:08:24+5:30
वैयक्तिक केस क्रिडेट कर्जाबाबत माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की, अनेक शिक्षक बांधवांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ...
वैयक्तिक केस क्रिडेट कर्जाबाबत माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की, अनेक शिक्षक बांधवांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेतून वैयक्तिक कॅश क्रेडिट कर्ज योजनेचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचा व्याजदर इतर राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा खूप जास्त आहे. राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे या बँकेतील वैयक्तिक कॅश क्रेडिट कर्ज योजनेचा व्याजदर ७ टक्के करण्यात यावा. यामुळे शिक्षक इतर बॅंकेत पगार खाते व कर्ज खाते उघडण्यासाठी जाणार नाहीत. तरी कॅश क्रेडिट व्याजदर ७ टक्केपर्यंत कमी करावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य कार्यकारी संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना देण्यात आल्या आहेत.
पुढील आठवड्यात बँकेच्या होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांनी भेटीवेळी बोलताना दिले.या वेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार,जिल्हा नेते प्रशांत वाघमोडे, दौड तालुकाध्यक्ष दुर्योधन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष श्याम बेंद्रे ,दौंड शिक्षक पतसंस्थेचे संचालक विश्वनाथ कौले, सूर्यकांत खैरे हे पदाधिकारी उपस्थित होते.