नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:21 PM2020-02-13T15:21:07+5:302020-02-13T15:22:42+5:30
दत्तवाडी येथील नाल्यात पडलेल्या चिमुकल्याचा मृतदेह म्हात्रे पुलाजवळील नदीपात्रात सापडला आहे.
पुणे : सिंहगड रस्त्यावरी दत्तवाडी येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संस्कार सुर्यकांत साबळे (वय 2 वर्षे) या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. म्हात्रे पुलाजवळील नदीपात्रात हा मृतदेह सापडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आज सकाळापासून चिमुकल्याचा शाेध सुरु हाेता.
बुधवारी संध्याकाळी दत्तवाडी येथील ओढ्याच्या पाण्यामध्ये सुर्यकांत हा चिमुकला वाहून गेला. त्याचे कुटुंबीय मुळचे बीड जिल्ह्याातील आष्टी येथील आहे. सध्या पुण्यातील दत्तवाडीतील म्हसाेबानगर रक्षालेखा साेसायटी येथे राहत आहेत. अचानक ओढ्याच्या वाढलेल्या पाण्यामुळे हा चिमुकला वाहून गेला. चिमुकल्याचे आई वडील कामाच्या शाेधात आठवड्यापूर्वी पुण्यात आले आहेत. ते त्याच्या भावाच्या शेजारी रुम घेऊन भाड्याने राहत आहेत. संस्कारचे वडील साफसफाईचे काम करतात तर आई गृहिणी आहे. त्यांच्या सुर्यकांत हा एकुलता एक मुलगा हाेता.
बुधवारी चिमुकला ओढ्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून शाेध माेहीम हाती घेण्यात आली. रात्री उशीरा अंधार झाल्याने शाेध माेहीम थांबविण्यात आली. आज सकाळपासूनच 2 फायरगाङ्या व 1 रेस्क्यु व्हॅनच्या साह्याने शोध सुरू हाेता. यावेळी म्हात्रे पुलाजवळील नदीपात्रात चिमुकल्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबीयांवर शाेककळा पसरली आहे.