सीईटी प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:51+5:302021-08-12T04:13:51+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारा विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखेत अकरावीत प्रवेश घेतो. त्यानंतर सीईटीच्या दृष्टीने तयारी करतो. काही विद्यार्थी सीईटीसाठी ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणारा विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखेत अकरावीत प्रवेश घेतो. त्यानंतर सीईटीच्या दृष्टीने तयारी करतो. काही विद्यार्थी सीईटीसाठी हजारो रुपये खर्च करून खासगी शिकवणी लावतात. विद्यार्थी बारावी परीक्षेपेक्षा सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. दरवर्षी बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सुमारे एक ते दीड महिना अगोदर सीईटी परीक्षेचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे विद्यार्थी सीईटीस अर्ज भरण्यास बारावीच्या निकालाची वाट पाहत नाहीत. सतत मुदतवाढ दिली तर परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सीईटी अर्जासाठी मुदतवाढ देणे शक्य नाही,असेही तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
-------
अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाते. पूर्वी आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठीसुद्धा ही परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता आर्किटेक्चरसाठी ‘नाटा’ परीक्षा होणार आहे.
-------------
सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत - १५ जुलै
बारावीचा निकाल ४ ऑगस्ट
सीईटी परीक्षेची प्रस्तावित तारीख : पहिले सत्र ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, दुसरे सत्र १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर
-----------------------------------
सीईटी परीक्षेस अवधी असल्यामुळे काही कारणास्तव सीईटीसाठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदत द्यावी,अशी मागणी केली जात आहे.
------------------