पुणे: जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर हरकती व सूचना मांडण्याची मुदत २ ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:14 PM2022-07-30T16:14:26+5:302022-07-30T16:15:01+5:30
पुणे : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी (दि. २८) जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीवर ...
पुणे : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी (दि. २८) जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीवर हरकती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे कक्ष तयार केला आहे.
यावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत २ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पुणे जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी दिली.
ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयांत सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.