पुणे-नाशिक महामार्गासाठी आता एप्रिल अखेरपर्यंत डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 09:02 PM2020-01-03T21:02:13+5:302020-01-03T21:02:46+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-नाशिक महामार्गाचे काम अत्यंत कासव गतीने सुरु

Deadline for Pune-Nashik highway now till end of April | पुणे-नाशिक महामार्गासाठी आता एप्रिल अखेरपर्यंत डेडलाईन

पुणे-नाशिक महामार्गासाठी आता एप्रिल अखेरपर्यंत डेडलाईन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे संबंधित विभागांना सूचना

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरु असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गांचे काम येत्या एप्रिल २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित सर्व विभागाने दिले आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने काम पूर्ण करा, असे आदेश ही राव यांनी दिले आहेत. 
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-नाशिकमहामार्गाचे काम अत्यंत कासव गतीने सुरु आहे. भूसंपादनाचा प्रश्न आणि महामार्गावरील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, भूसंपादन  समन्वय अधिकारी सारंग कोडलकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.
यावेळी राम म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाचे गट सुटलेल्या जमीन मालकांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुसंपादन अधिकाऱ्यांकडे लवकर सादर करावेत. तसेच भुसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीचे भुसंपादन करुन जमीन मालकांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा. या मार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी  कामे गतीने पूर्ण करावीत. तसचे  भूसंपादनाविषयीच्या जमीन मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत भूसंपादन समन्वय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे संपर्क केंद्र सुरु करावे, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Deadline for Pune-Nashik highway now till end of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.