अभिप्राय नोंदविण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:19+5:302021-05-10T04:12:19+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का? यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मत सर्वेक्षणातंर्गत मागविण्यात आले आहे. या दोन्ही सर्वेक्षणांवर शाळा आणि विद्यार्थ्यांना मत नोंदविण्यासाठी ९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, शाळा व विद्यार्थ्यांना यासंदर्भातील माहिती भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ११ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संबंधित लिंक सुरू ठेवली जाणार आहे. रविवारपर्यंत राज्यातील जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर २ लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.