Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:19 PM2022-08-17T12:19:38+5:302022-08-17T12:20:25+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता

Deaf students sang national anthem in sign language in Pune | Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत...

Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत...

googlenewsNext

वानवडी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त राज्यभर विविध शासकीय, खासगी, अस्थापणे संस्था शाळा, महाविद्यालय शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आदी ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. 

पुण्यात वानवडीतील आयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निवासी कर्णबधिर विद्यालय व संशोधन केंद्र या शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सामुदायिक राष्ट्रगीताचे गायन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत घाटके व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गायनानंतर इतनी शक्ती हमे देना दाता ही प्रार्थना करून 'भारत माता की जय' 'वंदे मातरम' अशा घोषणा देण्यात आल्या.

लष्कर पोलीस ठाण्यात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम
 
राज्य शासनाच्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात लष्कर पोलीस ठाणे सहभागी झाले होते. स्वराज्य महोत्सव म्हणून लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात लष्कर भागाचे सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लष्कर ठाण्यातील शंभरच्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी, यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Web Title: Deaf students sang national anthem in sign language in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.