जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Published: June 15, 2014 04:13 AM2014-06-15T04:13:09+5:302014-06-15T04:13:09+5:30

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील एका तरुणाचा विद्युत रोहित्राच्या धक्क्याने मृत्यू झाला.

Death of both victims in the district | जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Next

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील एका तरुणाचा विद्युत रोहित्राच्या धक्क्याने मृत्यू झाला. वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर बाजारपेठेतील दगडे डॉक्टरांच्या पाठीमागील व ग्र्रामपंचायतशेजारील असलेल्या विद्युत रोहित्राचा धक्का बसून अल्ताफ आदम मुलाणी (वय २१, रा. वालचंदनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १४) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या तरुणास गणेश बनसोडे याने अप्पा बेडवे याच्या मदतीने लासुर्णे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता अल्ताफ मुलाणी मरण पावला. या घटनेची खबर वालचंदनगरचे फिरोज गफूर मुलाणी (वय ३७) यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला दिली. .
कडेठाणला शेतकऱ्याचा मृत्यू
वरवंड : कडेठाण (ता. दौंड) परिसरात विजेच्या धक्क्याने वसंत पवार (वय ६४, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार केशव जगताप यांनी दिली. शुक्रवारी (दि.१३) रात्री ८ च्या सुमारास वसंत पवार हे आपल्या शेतामध्ये कामकाजासाठी गेले होते. तेव्हा शेतात विद्युत तारा खालवर लोंबलेल्या होत्या. त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने या तारांचा धक्का वसंत पवार यांना लागल्याने ते तारांना चिकटल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदरच्या तारा लोंबलेल्या अवस्थेत आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of both victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.