मोटारीच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

By Admin | Published: February 26, 2017 03:31 AM2017-02-26T03:31:09+5:302017-02-26T03:31:09+5:30

मंदोशी (ता. खेड) येथे रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने बालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. राजपूर (ता. आंबेगाव)

Death of a car in the shock of a car | मोटारीच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

googlenewsNext

डेहणे : मंदोशी (ता. खेड) येथे रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने बालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. राजपूर (ता. आंबेगाव) येथील सुनीता लोहकरे या मुलगा संकेत वसंत लोहकरे (वय ९) याला घेऊन शिवरात्रीसाठी कोटेश्वरच्या यात्रेला इतर महिलांबरोबर खासगी जीपने जात होत्या.
मंदोशी घाट उतरून आल्यानंतर ह्या महिला दुपारी १ वाजता तळपेवाडी (मंदोशी) येथे थांबल्या. मंदोशी येथे त्यांची जीप थांबल्यानंतर संकेत लघवीसाठी खाली उतरून पलीकडे गेला. परत गाडीकडे येत असताना शिरगावकडून वेगाने येणाऱ्या इको (एमएच ४२ के ७२६) या वाहनाने संकेतला ठोस मारल्याने तो गंभीर जखमी झाला. संकेतला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला.
इको गाडीचा चालक सचिन रामभाऊ वव्हाळ (रा. कोळवे, ता. खेड) यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर वेगाने गाडी चालवणे व मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस ठाण्याचे जमादार मांडवे अधिक तपास करीत आहेत.

या रस्त्यावर अनेक वेळा विनंती करूनही प्रशासनाने गतिरोधक बसवले नाहीत. काही ठिकाणी कठडे नाहीत. वाडा ते मंदोशी रस्त्यावर अनेक वळणे आहेत. तेथे दिशादर्शक फलक व कठड्यांची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
- बबन गाडे, सरपंच, मंदोशी

Web Title: Death of a car in the shock of a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.