पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:37 PM2019-08-13T12:37:40+5:302019-08-13T12:41:57+5:30

कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे.

death chance on the this route in pune | पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

पुण्यात '' येथे '' नेहमीच मृत्यू असतो दबा धरून : वाहनचालक भीतीच्या छायेखाली

googlenewsNext
ठळक मुद्देटेकडीच्या नेहमीच कोसळणाऱ्या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आंबेगाव बुद्रुक : कात्रज बाह्यवळण महामार्गावर सतत कडा कोसळत असून कोणत्याही  उपाययोजना  नाहीत.कात्रज बाह्यवळण महामार्गाची निर्मिती  पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी करण्यात आली. आंबेगाव बुद्रुक परिसरात अनेक चढउताराचे रस्ते असल्यामुळे हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे महामार्गाच्या निर्मितीमुळे आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पठार असे दोन भाग निर्माण झाले. रस्ता खोदकाम करून समांतर करण्यात आला. परंतु महामार्गाच्या बाजूस असणारे टेकड्यांचे कडे महामार्गावर पडू नयेत, म्हणून प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे  मुसळधार पावसामुळे प्रत्येक वर्षी कडा महामार्गावर कोसळलेला असतोच. प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.या ठिकाणी नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कात्रज बाह्यवळण रस्ता चर्चेचा विषय ठरत असतो. रस्त्यावर  कात्रज ते नवले पुलादरम्यान लहान-मोठे  खड्डे पडलेले असून ते बुजवले नसल्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
.......
कात्रज बाह्यवळण महामार्ग नेहमीच वर्दळ असणारा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर सेवा रस्ता नसल्याने अनेक प्रवासी उलट्या दिशेने प्रवास करताना दिसत आहेत. या महामार्गाच्या कडेला आंबेगाव बुद्रुक हद्दीत अभिनव शाळेसमोरील असणारे कडे ढासळत असल्याने वाहनचालक भीतीच्या छायेत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कडा पडला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी कडा पडला असून त्याच्या बाजूच्या कड्याचा भाग सुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. 
आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी प्रशासन एखादी घटना घडायची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांतून होत आहे.

Web Title: death chance on the this route in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.