पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या नागरिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:47+5:302021-08-20T04:15:47+5:30
सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. खडकी) असे या नागरिकांचे नाव आहे. सुरेश पिंगळे कुटूंबियासह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला ...
सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. खडकी) असे या नागरिकांचे नाव आहे. सुरेश पिंगळे कुटूंबियासह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला होते. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरीची संधी आली होती. त्यासाठी त्यांनी १ जुलैला चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला होता. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. दरम्यान, २२ जुलैला नामसाध्यर्मामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलीस ठाण्यातंर्गत पिंगळे विरूद्ध गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणालीत दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज व्हेरिफिकेनसाठी पाठविण्यात आला. २७ जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला होता. १८ ऑगस्ट रोजी ते चौकशीसाठी पुन्हा एक खिडकीत आले असताना त्यांना दोन पोलीस ठाण्याचा अहवाल आला आहे, एका पोलीस ठाण्याचा अहवाल बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यांना पुन्हा दुसर्या दिवशी बोलविण्यात आले होते. मात्र, त्यांनी नैराश्येतून स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यानंतर त्यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यु झाला.
........
९ पोलीस ठाण्यात मारावा लागला होता हेलपाटा
एका सामाजिक कार्यकर्त्याने काही महिन्यांपूर्वी चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला होता. त्यात त्याच्या नावासारखेच नाव असलेल्या एकावर शहरातील ९ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या संगणक प्रणालीत दिसून येत होती. त्याला तर तातडीने व्हेरिफिकेशन करुन हवे होते, तेव्हा तुम्हाला तातडीने प्रमाणपत्र हवे असे तर त्या त्या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा अहवाल मिळवावा लागेल, असा सल्ला देण्यात आला होता.