तहसीलदारांसमोर विषारी औषध प्राशन केलेल्या गुळाणी येथील शेतकऱ्याचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:13 PM2020-03-21T13:13:55+5:302020-03-21T13:14:00+5:30

शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्याने तहसीलदार दालनात विषारी औषध प्राशन केले होते.

Death of farmers in Gulani who poisoned drugs in front of collector | तहसीलदारांसमोर विषारी औषध प्राशन केलेल्या गुळाणी येथील शेतकऱ्याचा अंत

तहसीलदारांसमोर विषारी औषध प्राशन केलेल्या गुळाणी येथील शेतकऱ्याचा अंत

Next

राजगुरूनगर:  तहसीलदारांसमोर औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे गुळाणी ( ता. खेड ) येथील शेतकरी भगवान विठ्ठल गुळाणकर (वय ५५ ) यांचा उपचारादरम्यान शनिवारी(दि २१) मृत्यू झाला अशी माहिती गुळाणीचे माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी दिली.
गुळाणी गावठाण परिसरात असलेल्या आपल्या वहिवाट जागेवर गावातील अ‍ॅड. ज्ञानेश्वर रोडे,त्यांचे वडील व भाऊ यांनी मिळून अतिक्रमण केल्याचा आरोप मयत गुळाणकर यांनी केला होता. त्याविरोधात गेली आठ महिने विविध कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले होते. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्याने सोमवारी (दि१६) खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या दालनात विषारी औषध प्राशन केले होते.या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.तहसीलदार आमले यांच्या वतीने शेतकऱ्याविरोधात आत्महत्या प्रयत्न करून न्यायासाठी प्रशासनावर दबाव आणला म्हणून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.तर शेतकरी गुळाणकर यांच्या बाजूने त्यांचे बंधु सहादू विठ्ठल गुळाणकर यांनी अतिक्रमण करणारे विरोधक तसेच न्याय मागायला गेल्यावर दमबाजी, शिवीगाळ केल्यावरून पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी व गावातील इतर दोन इसम यांच्या विरोधात विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे यांच्याकडे तक्रार दिली आहे. आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या शेतकरी भगवान गुळाणकर यांनी औषध घेतल्यावर त्यांना राजगुरूनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे गुरुवारी सकाळी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी दिली.

Web Title: Death of farmers in Gulani who poisoned drugs in front of collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.