ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:56+5:302020-12-11T04:28:56+5:30
संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी यांनी सांगितले, बारामती तालुक्यातील कारखेल ग्रामपंचायतीमध्ये मी लिपिक पदावर कार्यरत होतो. मात्र वयोमानानुसार मला सेवा ...
संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी यांनी सांगितले, बारामती तालुक्यातील कारखेल ग्रामपंचायतीमध्ये मी लिपिक पदावर कार्यरत होतो. मात्र वयोमानानुसार मला सेवा निवृत्ती देण्यात आली. मात्र ही सेवा निवृत्ती कोणत्या शासकिय अध्यादेशाप्रमाणे देण्यात आली याची माहिती मागितली असता गटविकास अधिकाऱ्यांनी माहिती देणे टाळले. मी संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणून माझ्यावर अशी करवाई करण्यात आली आहे का? याबाबतचे देखीला उत्तर प्रशासनाकडे नाही. तसेच बाबुर्डी ग्रामपंचायतीतील शिपाई सुनिल बन्सीराम लडकत यांना देखील सेवेतून कमी केले गेले. याबाबत २०१८ मध्ये तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी सुनावनी घेतली होती. निकाल लडकत यांच्या विरोधात देण्यात आला होता. मात्र हा निकाल कोणत्या आधारावर देण्यात आला याबाबतच्या कागदपत्रांची माहिती मागितली असता देण्यात आली नाही.
बाबुर्डी येथील सफाई कर्मचारी कमल मोहन जगताप यांना सबंधीत ग्रामसेवकाने तीन महिन्याचा पगार दिला नाही. तसेच दिवाळीचा बोनस देखील देण्यात आला नाही. याबाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता. अरेरावीची भाषा वापरण्यात आली. जळगाव सुपे येथील सफाई कामगार हंबिर भिवा जगताप यांना २०१७ मध्ये सेवा निवृत्त करण्यात आले. अद्याप भविष्य निर्वाह निधी, रहाणीमान भत्ता आदी रक्कम दिली गेली नाही. तसेच नारोळी ग्रामपंचायतीचे मयत शिपाई वाघमारे यांच्या पत्नीला देखील रहाणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी देण्यात आला नाही. याबाबत संघटनेच्या वतीने वारंवार गटविकास अधिकारी राहूल काळभोर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. वारंवार तक्रारी केल्या असता संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी यांना सेवा निवृत्तीचा आदेश प्राप्त झाला. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
------------------------------
बारामती पंचायत समिती समोर विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
१०१२२०२०-बारामती-२०
--------------------------------