सरपंचाचे अतिक्रमण न काढल्याने निमगाव केतकीमध्ये आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:51+5:302021-05-30T04:08:51+5:30
निमगाव केतकरी ग्रामपंचायतीने ओढा खोलीकरण करण्यास सुरुवात केली आहे. ते करत असताना व्याहळी रोड ते कुस्ती आखाडापर्यंत ओढ्याच्या पात्रानुसार ...
निमगाव केतकरी ग्रामपंचायतीने ओढा खोलीकरण करण्यास सुरुवात केली आहे. ते करत असताना व्याहळी रोड ते कुस्ती आखाडापर्यंत ओढ्याच्या पात्रानुसार सर्वत्र समान पद्धतीने खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत नाही. ओढा खोलीकरणानंतर ओढ्या लगत असणाऱ्या तीन-चार मजली इमारतीच्या पाया खालची माती पावसाळ्यात पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून जाऊन इमारतीस धोका निर्माण होईल व त्यामुळे त्या इमारती व घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसेच खोलीकरणात ओढ्याचे पात्र शंकू आकाराचे झाले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या वेगापासून ग्रामपंचायत इमारतीस ही धोका होण्याची शक्यता आहे. या ओढ्यातून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन सरपंचाने दमदाटी करुन फोडून काढल्या आहेत, त्यांची भरपाई देण्यात यावी आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. या आंदोलनास निमगाव केतकी बहुजन मुक्ती पार्टीचे दत्ता मिसाळ, अतुल खुपसे, योगेश राऊत, बाबासाहेब पाडुळे, दादासाहेब किरकत, राहुल जाधव आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला.
ओढा खोलीकरणासाठी काम स्वयंसेवी संस्थांकडून २ लाख रुपये मिळाले आहेत व उर्वरीत काम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायत करत आहे. अतिक्रमण सोडून उपलब्ध असणारे ओढ्याच्या पात्रानुसार आपण काम करत आहे.
- लक्ष्मीकांत जगताप, ग्रामसेवक
---------------------------
निमगाव केतकी ओढ्याच्या हद्दी कायम नसल्यामुळे आपण उपलब्ध पात्रानुसार खोलीकरण व रुंदीकरण करत असून शासनाने ओढ्याची हद्द निश्चय केल्यानंतर पुढील रुंदीकरण करणार आहोत.
- सरपंच, प्रवीण डोंगरे
निमगाव केतकी ओढा रुंदी व खोली करणातील मनमानी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सुरू असलेले आमरण उपोषण.
२९०५२०२१-बारामती-०१
===Photopath===
290521\29pun_1_29052021_6.jpg
===Caption===
निमगाव केतकी ओढा रुंदी व खोली करणातील मनमानी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सुरु असलेले आमरण उपोषण.२९०५२०२१-बारामती-०१