पिंपळवंडीत ग्रामस्थांच्या डोक्यावर लोंबकळतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:08+5:302021-07-29T04:12:08+5:30

पिंपरी पेंढार : पिंपळवंडीत उंब्रज रस्त्यालगत वाकी वस्ती येथे विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळल्या असून तीनच दिवसांपूर्वी बोरी खुर्द ...

Death hanging on the head of villagers in Pimpalwandi | पिंपळवंडीत ग्रामस्थांच्या डोक्यावर लोंबकळतोय मृत्यू

पिंपळवंडीत ग्रामस्थांच्या डोक्यावर लोंबकळतोय मृत्यू

googlenewsNext

पिंपरी पेंढार : पिंपळवंडीत उंब्रज रस्त्यालगत वाकी वस्ती येथे विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळल्या असून तीनच दिवसांपूर्वी बोरी खुर्द येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात नागरिकांना बाहेर पडतानाही मृत्यू आपल्या डोक्यावर लोंबकळतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पिंपळवंडी उंब्रज रस्त्यालगत विजेच्या तारा अत्यंत धोकादायक पद्धतीने लोंबकळ्या आहेत. इतकेच नाही तर वाकीवस्ती या ठिकाणी असलेले शेतकरी चंद्रकांत खंडू फुलसुंदर यांच्या शेतातही अगदी उभे राहिल्यानंतर डोक्याच्या वर एक ते दिड फूट अंतरावर या वीजवाहक तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याला शेतीत मशागत करताना अनेक अडचणी येत आहेत. शेतात उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर आहे व त्याच्याच बाजूला बांधावर सिंगल फेज असलेला दुसरा ट्रान्सफार्मर आहे. हा ट्रान्सफार्मर या मोठ्या ट्रान्सफार्मर्वर पडला आहे. त्यामुळे त्याचा सर्व भार हा मोठ्या ट्रान्सफार्मरवर आला आहे जर हे दोन्हीही ट्रान्सफार्मर कोसळले तर मोठी दुर्घटना घडू शकते. याबाबत महावितरण कंपणीस सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांने केला आहे.

पिंपळवंडी उंब्रज रस्त्यालगत पिंपळवंडी स्टँड ते वाकीवस्ती या दरम्यान वीजवाहक तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातही अशाच प्रकारच्या तारा आहेत या लोंबकळणाऱ्या तारा वाऱ्याच्या झोताने एकमेकाला घासून ठिणग्या उडत आहेत. त्या ठिणग्या शेतातील ऊस पेटले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत तसेच अनेक ठिकाणी डीपीच्या फ्यूज बाॅक्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामधील फ्यूजपण फुटलेले आहेत त्यामुळे विजेचा शाॅक लागून दुर्दैवी घटना घडू शकते.

--

चौकट

बोरी खुर्दमध्ये पितापुत्रांना फटका

--

महावितरण कंपणीचा भोंगळ अशाच भोंगळ कारभाराचा फटका बोरी खुर्द येथील यादव पटाडे व श्रीकांत पटाडे या पितापुत्रांना बसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यकाळात अशाच घटना घडू शकतात याबाबत महावितरण कंपणी डोळेझाक करत असून महावितरण कंपनी पुन्हा बोरी खुर्द येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट पहात आहे काय असा प्रश्न नागरीकांमधून केला जात आहे. पिंपळवंडी परिसरात धोकादायक पद्धतीने लोंबकाळणाऱ्या तारा तात्काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा एखादी दुर्देवी घटना घडल्यास त्यास महावितरण कंपणीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु असा इशारा पिंपळवंडी ग्रामस्थांनी दिला आहे.

--

फोटो क्रमांक : २८ पिंपरी पेंढार वीज वितरण लोंबकळत्या तारा

फोटो ओळी : पिंपळवंडीत अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने लोंकळल्या विजेच्या तारा

Web Title: Death hanging on the head of villagers in Pimpalwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.