मजूर महिलेचा मृत्यू

By admin | Published: September 25, 2015 01:07 AM2015-09-25T01:07:39+5:302015-09-25T01:07:39+5:30

पिंपळे सौदागर येथे ‘झुलेलाल टॉवर’ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खाली काम करीत असलेल्या मजूर महिलेच्या डोक्यात सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा

Death of a labor woman | मजूर महिलेचा मृत्यू

मजूर महिलेचा मृत्यू

Next

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे ‘झुलेलाल टॉवर’ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खाली काम करीत असलेल्या मजूर महिलेच्या डोक्यात सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा बुधवारी मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शतरूपा श्यामलाल यादव (वय ३२) असे आहे.
पोलिसांनी साईटवर जाऊन पाहणी केली. मात्र, बिल्डरच्या दबावामुळे पोलिसांकडून दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पिंपळे सौदागर येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास इमारतीच्या खाली वाळू चाळण्याचे काम मजूर महिला करत होती. अचानक महिलेच्या डोक्यावर सातव्या मजल्यावरून लाकडी वासा पडला. त्याच ठिकाणी ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास घटना घडली; मात्र पोलिसांना याबद्दल दुपारपर्यंत काहीच माहिती नव्हती. गोविंद यशदा चौकाजवळ अपघात झाला असून, त्यात महिला जखमी झाल्याची अफवा सर्वत्र पसरण्यात आली. एवढेच नाही, तर महिलेच्या नातेवाइकांनाही याबाबत गोपनीयता बाळगण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे नेमके काय घडले हे कोणालाही समजू शकले नाही. पिंपळे सौदागरचे पोलीससुद्धा नेमकी घटना कोठे घडली याचा शोध घेत होते. दुपारी पोलिसांनी वायसीएम रुग्णालय, तसेच शवागार या ठिकाणी चौकशीसाठी धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी पोलिसांना प्रत्यक्ष घटना काय घडली, कोठे घडली, याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतरही महिलेचे नातेवाईक पोलिसांना खरी माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारणा केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.(प्रतिनिधी)

Web Title: Death of a labor woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.