पुण्यातील विद्यार्थ्यांचा लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु
By admin | Published: April 6, 2017 10:05 PM2017-04-06T22:05:03+5:302017-04-06T22:05:03+5:30
पुण्यातील एका विद्यार्थ्यांचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी
लोणावळा : पुण्यातील एका विद्यार्थ्यांचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमच्या सहाय्याने रात्री उशिरा हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
पियुष संजीव रस्तोगी (वय २० वर्ष,रा. श्रीनिकेतन हाँस्टेल, कोथरुड बस स्थानक. मूळचा राहणार अलादबाद, उत्तरप्रदेश) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुण्यातील आगरवाल क्लासेस टिळकरोड येथे सीए करत होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील लायन्स पाँईट येथिल दरीत सुमारे ६०० ते ७०० फुट खोल अंतरावर त्याचा मृतदेह मिळून आला.
रस्तोगी हा काल बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कोथरुड हाँस्टेल मधून त्याची दुचाकी गाडी क्र. (युपी ७० सीसी ९१५५) घेऊन बाहेर पडला होता. मात्र तो कोठे गेला याबाबत कोणाला माहिती नव्हती, रात्री तो हाँस्टेलला परत न आल्याने व संपर्क देखिल होत नसल्याने त्याचा भाऊ आयुष याने आज सकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आज सकाळी स्थानिक दुकानदारांना पाँईटजवळ दुचाकी गाडी दिसल्याने त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमच्या मदतीने दरीत उतरुन पाहणी केली असता जवळपास सहाशे ते सातशे फुट खोल अंतरावर पियुष रस्तोगीचा मृतदेह मिळून आला आहे.