स्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू; अवघ्या गावावर शोककळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:14 PM2022-01-20T21:14:38+5:302022-01-20T21:14:47+5:30

मुलगी ठार झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला

Death of a girl in an accident while returning from shopping for her own wedding Mourning on the village | स्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू; अवघ्या गावावर शोककळा...

स्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू; अवघ्या गावावर शोककळा...

googlenewsNext

वरवंड : स्वत:च्याच लग्नाची खरेदी करून भावासह गावाकडे परत निघालेल्या नवरीमुलीचा वाटेतच अपघात झाला. त्यात नवरीमुलगी जागीच ठार झाली तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कौठीचा मळाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास घडली.प्रतीक्षा सादशिव कांबळे (वय २१) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर तिचा भाऊ शुभम सदाशिव कांबळे (मलठण ता. दौंड) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिक्षा हीचे पुढच्या महिन्यात लग्न ठरले होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती तिचा भाऊ शुभम याच्यासह मोटारसायकलवर गुरुवारी सकाळीच ते पुणे शहरात गेले होते. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी मलठणला (ता. दौंड) घरी परतत असातना वाटेत कौठीचा मळा जवळ एका डंपरने ठोकरले. त्यामध्ये प्रतिक्षाच्या डोक्याला जबर मार लागला व तीचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम हा गंभीर जखमी झाला. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक मात्र ट्रकसह पळून गेला. आपघाच्या आवाजाने परिसरातील लोक गोळा झाले त्यांनी पोलिसांनी बोलावले. जवळच असलेल्या टोलनाक्यावरील रुग्णवाहितीकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले आणि शुभम याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान अपघातस्थळी त्यानी लग्नासाठी खरेदी केलेले कपडे व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. त्यामध्ये शुभमच्या ओळखपत्र आणि त्याच्या मोबाईलमुळे त्याच्या घराच्यांना पोलिसांनी फोन करून घटनेची माहिती दिली. मुलगी ठार झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटना गावामध्ये कळताच अवघ्या गावावर शोककळा पसरली.

Web Title: Death of a girl in an accident while returning from shopping for her own wedding Mourning on the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.