अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:48 AM2024-11-27T09:48:56+5:302024-11-27T09:49:48+5:30

पुणे स्टेशन, लोणी काळभोर, कोंढवा भागात १०० ते १५० किलो गांजा पकडून देण्यात लिओची महत्वाची भूमिका

Death of beloved drug buster Leo dog Worked for last 8 years in pune police | अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत

अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत

पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेत मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि गेल्या आठ वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेला लाडका श्वान ‘लिओ’चा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शोकाकुल वातावरणात सलामी गार्डने लिओला अखेरची मानवंदना दिली.

लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला. तो चार महिन्यांचा असताना, सप्टेंबर २०१६ मध्ये पुणे पोलिस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून (हँडलर) खडतर प्रशिक्षण देण्यात आले. श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अंमली पदार्थ हुडकणे, तसेच कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा समावेश गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात करण्यात आला होता. विविध शाळा, तसेच लष्कराच्या कार्यक्रमात लिओ सहभागी व्हायचा.

आठ वर्षांतील कामगिरी 

- गेल्या आठ वर्षांपासून लिओ गुन्हे शाखेत कार्यरत होता. सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोरमधील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. या शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता.
- एका नायजेरियन तस्कराकडून गांजा, तसेच मेफेड्रोनचा साठा पकडून देण्यात लिओची दमदार कामगिरी हाेती. २०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओची महत्त्वाची भूमिका होती.
- पुणे रेल्वे स्थानक, तसेच बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘लिओ’ला नेण्यात यायचे. अन्य श्वानाच्या तुलनेत लिओची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना झाला होता.

Web Title: Death of beloved drug buster Leo dog Worked for last 8 years in pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.