हॉटेल गारवाच्या मालकांची मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:07+5:302021-07-22T04:09:07+5:30
शुक्रवारी उरुळी कांचन येथे गारवा हॉटेलचे मालक रामदार आखाडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. त्यामुळे ...
शुक्रवारी उरुळी कांचन येथे गारवा हॉटेलचे मालक रामदार आखाडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी लोणीकाळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमरास मृत्यू झाला. त्यानंत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जावाजीबूवाची वाडी (ता. दौंड) येथे त्यांचे पार्थीव आणण्यात आले. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून गर्दी झाली होती.
घरी बेताची परिस्थिती असताना आगोदर लहान मोठे व्यवसाय आणि नंतर उरुळी कांचन येथे भाड्याने जागा घेऊन हॉटेल गारवा चालू केले होते. मागील काही वर्षात त्यांनी हॉटेल व्यवसायात मोठा जम बसविला होता. कमी किमतीत दर्जेदार जेवण मिळत असल्याने त्यांचे हॉटेल अत्यंत प्रसिद्ध झाले होते. व्यवसाय बरोबरच त्यांच्या कुटूंबाने कासुर्डी ग्रामपंचायत मध्ये राजकीय ठसा उमटवला होता. आज अत्यंविधी वेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यासह अनेक राजीकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
--
चौकट :
हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून रामदास आखाडे यांचा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी आद्यप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसल्याने खरे प्रकरण समोर आलेले नाही. युवा व्यावसायिकाचा निर्घृण खून झाल्याने दौंडसह हवेली मध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करून सर्व सहभागी आरोपींचा छडा लावण्याची मागणी होत आहे.
--
फोटो क्रमांक : २१ यवत
फोटो ओळ : जावजी बुवाची वाडी (ता.दौंड) येथे रामदास आखाडे यांचे पार्थिव आणले त्यावेळी शोकाकुल युवक वर्ग जमा झालेले होता.