अपघातात आईवडिलांच्या मृत्यूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:11+5:302021-05-30T04:09:11+5:30
सांगवी: अपघातात आईवडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव मारुती ...
सांगवी: अपघातात आईवडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव मारुती माने व विमल ज्ञानदेव माने असे अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत. तर या दांपत्याचा चालक मुलगा शेखर ज्ञानदेव माने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद शेखर माने याचा मेहुणा गणेश रेवन जाधव (वय ३५ रा. चेंबूरनाका, सॅंडीस कॅम्प, सातवा मळा, चेंबुर, वेस्ट मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: शेखर माने हा आपले आईवडील आणि मेहुणा गणेश जाधव यांच्या बरोबर मंगवळवारी (दि. १८) चारचाकी वाहनातून इंदापूर तालुक्यातील जांब या गावी निघाले होते. बारामती- मोरगाव रोडवर जळगाव कडेपठार गावच्या हद्दीत महादेव मंदिराजवळ शेखरचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. यामध्ये ज्ञानेदव माने व विमल माने यांचा मृत्यू झाला, तर मेहुणा गणेश जाधव गंभीर जखमी झाला होता. शेखरही जखमी झाला होता. अधिक तपास पोलीस हवालदार बाळासाहेब सोनवलकर करत आहे.