पुणे-सोलापूर महामार्गावर ‘मृत्यू’चे पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:37 AM2018-12-10T02:37:38+5:302018-12-10T02:38:05+5:30

महामार्ग प्रशासन, पोलिसांकडून दुर्लक्ष; महामार्गावर उभी राहताहेत धोकादायकरीत्या अवजड वाहने

'Death' parking on Pune-Solapur highway | पुणे-सोलापूर महामार्गावर ‘मृत्यू’चे पार्किंग

पुणे-सोलापूर महामार्गावर ‘मृत्यू’चे पार्किंग

Next

भिगवण : भिगवण येथे पुणे-सोलापूर महामार्गावरच अनधिकृतरीत्या वाहने पार्किंग केली जात आहे. आतापर्यंत अनेक गंभीर अपघात घडून हकनाक जीव गेले आहेत. मात्र महामार्ग प्रशासन, महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासन लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. तर रस्ते सुरक्षेसाठी नेमलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी कामात कसूर करीत असल्याने अपघातांची संख्या वाढीस लागली असल्याचे दिसून येते.

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे हायवेवर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हिस रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे फळे, व्यावसायिक तसेच भिगवण बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक पुण्याकडून सोलापूरकडे जाणाºया बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग करीत असल्याने आतापर्यंत दोन-चार गंभीर अपघातही घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. याकडे रस्ते सुरक्षेसाठी नेमलेले महाराष्ट्र सुरक्षा बल, टोल प्रशासन आणि वाहतूक पोलीस कोणतीही कडक भूमिका घेत नसल्याने वाहने पार्किंग करणाºयांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. हायवेवर वाहने पार्किंग करू नये. या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्याने काही व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागाच आरक्षित केल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरच गाड्या दुरुस्ती केली जात असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे यावर टोल प्रशासन तसेच महामार्ग पोलीस यांनी तातडीने कारवाई करून या अवैध पार्किंग करणाºयांविरोधात शासन करण्याची गरज असल्याचे सामाजिक संघटना मत व्यक्त करीत आहेत.

Web Title: 'Death' parking on Pune-Solapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.