घुबड तलावासमोरील धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:26 PM2017-07-20T12:26:21+5:302017-07-20T12:30:01+5:30
लायन्स पाँईटजवळील घुबड तलावातून वाहणाऱ्या धबधब्यात पडून एका युवा पर्यटकाचा गुरूवारी मृत्यु झाल्याची माहिती मिळते आहे .
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 20- लायन्स पाँईटजवळील घुबड तलावातून वाहणाऱ्या धबधब्यात पडून एका युवा पर्यटकाचा गुरूवारी मृत्यु झाल्याची माहिती मिळते आहे . गुरूवारी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. धवल विजय परमार ( वय 26, रा. अंधेरी, मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी तो चार ते पाच मित्रांच्या समवेत लायन्स पाँईट परिसरात फिरायला आला होता. यावेळी धबधब्यात पडून धवलचा मृत्यु झाला. लोणावळा शहराचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जोरदार पाऊस व धुके यामुळे बचाव पथकाला अडथळा होत आहे.
लोणावळा परिसरात मागील आठवडा भरापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. तसेच डोंगर दर्यांमधून वाहणार्या धबधब्यांना मोठा वेग आला आहे. रविवारी हडपसर पुणे येथिल एका युवकाचा भूशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात पडून मृत्यु झाला होता. तर गुरूवारी सकाळी ही दुसरी घटना घडली आहे.