सांबराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कॅनॉलद्वारे आले हडपसर परिसरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:50 AM2018-12-29T01:50:32+5:302018-12-29T01:51:47+5:30

भिगवण परिसरातून दिशाभूल होऊन कॅनॉलमधून हडपसर भागात आलेल्या सांबाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हडपसर भागात या सांबराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

The death of Sambara heart attack and the canal came from Hadapsar area | सांबराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कॅनॉलद्वारे आले हडपसर परिसरात

सांबराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कॅनॉलद्वारे आले हडपसर परिसरात

Next

पुणे : भिगवण परिसरातून दिशाभूल होऊन कॅनॉलमधून हडपसर भागात आलेल्या सांबाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हडपसर भागात या सांबराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे हे सांबर घाबरले आणि सैरावैरा धावू लागले. त्यात त्याला अनेक ठिकाणी इजाही झाली. ते घाबरल्यामुळे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच त्याला न्यूमोनिया झाल्याचेही शवविच्छेदनात समोर आले.

भिगवण परिसरात सांबर दिसल्याने त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात यश आले. या सांबराची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया झाल्याचेही निष्पन्न झाले, अशी माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील डॉ. सुचित्रा सोळंकी पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

अग्निशामक दलाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. पाठोपाठ वन विभागाचे कर्मचारी, कात्रज प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी आले. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी डॉट मारून सांबाराला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, प२२ण ते बेशुद्ध झाले नाही. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये पकडले. त्याच्या तोंडाला थोडीशी जखम झाली असून त्याची कात्रज येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. तेथे
त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़

शक्यतो ‘ते’ लोकवस्तीत येत नाहीत भिगवण, दौंड परिसरात असंख्य हरीण, सांबर, काळवीट आढळून येतात. पण ते शक्यतो लोकवस्तीत येत नाही. बारामती तालुक्यात त्यांच्यासाठी अभयारण्य तयार करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून सध्या कालव्यातील पाणी बंद केल्याने कालवा कोरडा पडला आहे. दौंड, भिगवण भागात हे सांबार रात्री कोठेतरी कालव्यात पडले. कालवा कोरडा अस्२२ाल्याने त्याला वर येता येत नव्हते.
त्यामुळे कालव्यातून थेट हडपसरमधील सातववाडी, उन्नतीनंतर परिसरात आले. सकाळी जेव्हा येणाºया जाणाºया लोकांना कालव्यात हे सांबर दिसले. कालव्यातून ते बाहेर आले व सातववाडी तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली.

सांबराची दिशाभूल झाल्याने ते हडपसर परिसरात कॅनॉलद्वारे आले. कॅनॉलमध्ये थंड पाणी होते. त्यामुळे त्याला न्यूमोनिया झाला होता. त्यात लोकांची गर्दी पाहून ते घाबरले. त्यामुळे इकडे-तिकडे पळू लागले. त्यात त्याला अनेक ठिकाणी इजा झाल्या. लोकांची त्याला सवय नसते. त्यामुळे एकदम गोंगाट ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला.
- डॉ. सुचित्रा सोळंकी पाटील, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
सांबर हे त्याच्या नैसर्गिक परिसरातून दुसरीकडे गेल्याने ते घाबरले होते. अनोखळी परिसरात आल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असणार आहे. ते कॅनॉलमधून आल्याने हडपसरमध्ये आले असेल.
- श्रीलक्ष्मी, मुख्य वनसंरक्षक, पुणे विभाग
 

Web Title: The death of Sambara heart attack and the canal came from Hadapsar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे