निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:16+5:302021-07-30T04:10:16+5:30
शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथील गणेश गोविंदराव पानसरे (वय २७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, ...
शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथील गणेश गोविंदराव पानसरे (वय २७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, चुलते, बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सर्जेराव पानसरे व ॲड. सुखदेव पानसरे यांचे ते पुतणे होत.
फोटो : गणेश पानसरे.
----
पांडुरंग इंगळे
शेलपिंपळगाव : पांडुरंग गणपत इंगळे (वय ६५, रा. शेलपिंपळगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, नातेवाईक असा परिवार आहे. येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जालिंदर इंगळे व संदीप इंगळे यांचे ते वडील होत.
फोटो : पांडुरंग इंगळे.
सरस्वतीबाई दुडे
टाकळी हाजी : निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील सरस्वतीबाई रुपाजी दुडे पाटील (वय ७६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सात मुली, सुना, जावई,नातू असा परिवार आहे. सोसायटीचे अध्यक्ष विजय दुडे व माजी सरपंच दीपक दुडे यांच्या त्या आई तर माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या त्या भावजय होत.
-------
शंकरराव मेहेर
नारायणगाव : नारायणगावचे भूमिपुत्र असलेले मुंबई येथील प्रसिद्ध भाजीपाला व्यापारी शंकरराव चिमाजी मेहेर (वय ९४) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे, पतवंडे, जावई, पुतणे असा परिवार आहे. देशातील अनेक प्रांतांतील शेतकरी बंधू भगिनींचे आर्थिक हितचिंतक म्हणून त्यांची ख्याती होती. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांचे चुलतभाऊ व ग्रामोन्नती मंडळाचे संचालक अरविंद मेहेर यांचे ते चुलते होत.
फोटो-