निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:04+5:302021-04-29T04:09:04+5:30
औंध : औंध गाव विश्वस्त मंडळाचे माजी सल्लागार अरुण सुधाकर गराडे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या ...
औंध : औंध गाव विश्वस्त मंडळाचे माजी सल्लागार अरुण सुधाकर गराडे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, विवाहित दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिपेश गराडे त्यांचे ते वडील होत.
लक्ष्मण कांचन
पुणे : बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण बाबूराव कांचन (वय ८४) यांचे बुधवार निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, बहिणी, पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. खूप कष्टातून त्यांनी पुण्यामध्ये बांधकाम व्यवसाय वाढविला. सरकारी इमारती तसेच कित्येक बंगले, सोसायट्या त्यांनी नावारूपास आणल्या. पुणे परिसरामध्ये आज मोठे गृहप्रकल्प नावारूपास येत आहेत.