निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:32+5:302021-05-01T04:10:32+5:30
पुणे : सुभाष अमराळे वय (70)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. ...
पुणे : सुभाष अमराळे वय (70)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. ते मुळशी तालुक्यातील अंबवडे गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होत. नामदेवराव भोर
पुणे : निवृत्त गटविकास अधिकारी नामदेवराव कृष्णाजी भोर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीचेच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते.
वसंतराव साळुंके
धनकवडी : शिवाजी मराठा हायस्कुलचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक वसंतराव अण्णासाहेब साळुंके ( वय ८१) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातू असा परिवार आहे. ते थोर समाजसेवक स्व. बाळा साहेब भारदे यांचे निटवर्तीय होते. पुणे येथील दत्त दिगंबर दूध वाहतूक संस्थेचे संचालक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य, ससून रुग्णालय रुग्ण समिती सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, धनकवडी येथील राजगड ज्ञानपीठ संस्थेचे व्यवस्थापक अशा विविध पदावर त्यांनी काम केले. सयाजी हॉटेल्स लिमिटेड चे अँडमिन मँनेजर पराग साळुंके आणि बारामती येथील सातव हायस्कूल मधील शिक्षिका मनीषा पाटणकर यांचे ते वडील होत.