निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:29+5:302021-05-07T04:11:29+5:30
खांडज : येथील तान्हूबाई जगदेवराव आटोळे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पाच विवाहित मुले व एक ...
खांडज : येथील तान्हूबाई जगदेवराव आटोळे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पाच विवाहित मुले व एक मुलगी आहे. खांडज गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण आत्माराम आटोळे यांच्या आजी व ग्रामपंचायत सदस्या अर्चना किरण आटोळे यांच्या आजी सासू होत्या
फोटो आहे :
-----
नारायण पांडुरंग होले
सासवड : नारायण पांडुरंग होले (वय ५८) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. पुणे महानगरपालिकेतील आरोग्य सेवक अक्षय सपकाळ याचे ते सासरे होत.
फोटो आहे
-----
सोपान फडतरे
गराडे : बोपगाव (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गड नवनाथ पंचायत कमिटी ट्रस्टचे विश्वस्त सोपान मारुती फडतरे (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. कांदिवली येथील काळूबाई रसवंती गृहाचे मालक संदीप फडतरे यांचे ते वडील होत.
फोटोओळी - सोपान फडतरे
----
गजानन प्रभुणे यांचे
बारामती : बारामती नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी गजानन गंगाधर प्रभुणे (वय ८३) यांचे बुधवारी ( दि.५) अल्पशा आजाराने निधन झाले. नगर परिषदेतील अधिकारी संजय प्रभुणे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे विवाहित मुले, मुलगी असा परिवार आहे.
————————————
फोटोओळी—गजानन प्रभुणे
०६०५२०२१ बारामती—०२
-----
नामदेव मोहंडुळे
तळेघर : येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव सोमा मोहंडुळे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आदिवासी भागामध्ये सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. समाजकल्याण अधिकारी हनुमंत इष्टे यांचे मेहुणे तर सामाजिक कार्यकर्ते अजित मोहंडुळे यांचे ते वडील होत.
फाेटो आहे
----
शर्वरी भोंग यांचे निधन
पुणे : संगमनेर येथील रहिवासी शर्वरी श्रीनिवास भोंग (वय ३७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, सासरे, आई आणि वडील आहेत. संगमनेर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीनिवास भोंग यांच्या त्या पत्नी होत. आकाशवाणी पुणे केंद्रावर काही काळ त्यांनी निवेदिका म्हणून काम केले होते. त्या मूळच्या शिरूर (जि. पुणे) येथील रहिवासी होत्या. शिरूरच्या विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या त्या कन्या होत.
फोटो आहे