Pune Crime: दारू पिण्यास मनाई केल्याने जिवे मारण्याची धमकी; कोथरूडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:08 IST2022-10-06T17:06:29+5:302022-10-06T17:08:40+5:30
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

Pune Crime: दारू पिण्यास मनाई केल्याने जिवे मारण्याची धमकी; कोथरूडमधील घटना
पुणे : दारू पिण्यास मनाई केल्याने एकास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोथरूड भागात घडली.
याबाबत ऋषीकेश भास्कर यशाेदे (वय ४३, रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरूडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघेजण दारू पित होते.
त्यावेळी यशोदे यांनी सोसायटीच्या आवारात दारू पिऊ नका, असे तिघांना सांगितले. आम्हाला ओळखले नाही का? आम्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहोत. तिघांनी यशोदे यांनी पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी दिली, असे यशोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राठाेड तपास करीत आहेत.