मुंबईकडून पुण्याकडे येत असताना झालेल्या मोटार अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:12 AM2017-10-25T01:12:45+5:302017-10-25T01:12:56+5:30
उर्से : मुंबईकडून पुण्याकडे येत असताना झालेल्या मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना द्रुतगती महामार्गावरील आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७९ जवळ मंगळवारी पहाटे सहाला घडली.
उर्से : मुंबईकडून पुण्याकडे येत असताना झालेल्या मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना द्रुतगती महामार्गावरील आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७९ जवळ मंगळवारी पहाटे सहाला घडली. महामार्ग पोलीस विलास साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम विलास साळुंखे (वय २८, रा. वडगाव धायरी, पुणे), राहुल हनमंत राजगुरू (वय २६, रा. धनकवडी, पुणे) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. स्वप्निल अनिल घोरपडे (वय २६, रा. स्वारगेट पोलीस लाईन, पुणे), प्रतीक भास्कर आमरे (वय २६, रा विठ्ठलवाडी, हिंगणे) हे दोघे जखमी असून, त्यांच्यावर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईकडून पुणेच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच १२, केएन ७५४५) आढे गावच्या हद्दीतून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही मोटार जवळच असलेल्या खोल ओढ्यात जाऊन पडली. अपघाताची माहिती मिळताच द्रुतगती महामार्ग पोलीस व महामार्ग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.