पुण्याजवळ एसटी-टेम्पोचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 07:13 AM2017-08-28T07:13:18+5:302017-08-28T11:41:21+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ  एसटी आणि टेंम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.  

Death toll of ST truck in Pune, 9 deaths | पुण्याजवळ एसटी-टेम्पोचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

पुण्याजवळ एसटी-टेम्पोचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Next

पुणे, दि. 28 -  पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ  एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.  एस.टी. आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याने भरलेल्या टेम्पो पंक्चर झाल्यामुळे टायर बदलण्यासाठी चालकानं टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता.  त्यामुळे एस.टी. चालकाला रस्त्याशेजारील टेम्पो दिसला नाही आणि एस.टी. थेट जाऊन टेम्पोला धडली. या अपघात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नारायणगाव येथील भीषण अपघातात एसटीचा चालक सुदैवाने वाचला. तर अपघातात आयशर टेम्पो चालक, आयशर टेम्पोच्या मदतीसाठी थांबलेला ट्रक चालक यांचा या अपघातामध्ये दुदैवी मृत्यू झाला आहे. ट्रक चालक किशोर यशवंत जोंधळे (वय ४०)  आयशर ट्रकचा चालक रशिद गुलाब पठाण,(वय ३०) , शोभा नंदू पगार (वय ४५), यमुना भिला पगार (वय ५५), संकेत दत्तात्रय मिस्त्री, विकास चंद्रकांत गुजराथी  (वय ५०)  सागर कृष्णलाल चौधरी (वय २७ रा.) अभिकेत जोशी (वय २५)  अशी यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून मृत्यू झालेल्या एका महिलेची अद्याप ओळख पटली नाही,
 तर जखमींना नारायणगाव ,पिंपरी चिंचवड व आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे , या अपघाताची खबर एस टी चालक संतोष यशवंत गुलदगड (वय 32) रा. पळशी,  ता. बारामती यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे, अशी माहिती स.पो.निरीक्षक ए.एल.गोरड यांनी दिली.

त्रिंबकेश्वर-पुणे या एसटीचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये एसटीतील सात प्रवशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोचं चाक बदलणाऱ्या दोघांचा एस.टीनं धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. जखमींची अवस्था पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, रविवारी नाशिक येथे साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले. येवला- मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. तर  अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील 10 भाविक व जीपचालक अशा 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पर्युषण पर्व सांगतेला एकाच कुटुंबातील भाविकांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली. 

Web Title: Death toll of ST truck in Pune, 9 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात