भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; नवले पुलाजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:34 IST2021-06-11T17:33:37+5:302021-06-11T17:34:30+5:30
वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; नवले पुलाजवळील घटना
धायरी: अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अमित शेषराव देशपांडे ( वय :४२, रा. सुंदर सहवास सोसायटी, आनंदनगर, वडगांव बुद्रुक, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित सरदेशपांडे हे वडगांव बुद्रुक येथे राहावयास असून ते नऱ्हे येथे असणाऱ्या बहिणीकडे जात होते. वडगांव बुद्रुक येथील सेवा रस्त्यावरून ते जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी साळुंखे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.