विंचू चावल्यामुळे महिलेचा मृत्यू
By admin | Published: March 17, 2017 02:04 AM2017-03-17T02:04:48+5:302017-03-17T02:04:48+5:30
खोडद (ता. जुन्नर) येथील सुलाबाई लक्ष्मण एरंडे (वय ६५) यांचा नुकताच विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि विंचूदंशाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ या घटनेतून आली आहे.
खोडद : खोडद (ता. जुन्नर) येथील सुलाबाई लक्ष्मण एरंडे (वय ६५) यांचा नुकताच विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि विंचूदंशाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ या घटनेतून आली आहे.
सुलाबाई एरंडे यांना रविवारी (दि.१२) सकाळी ७:३० च्या सुमारास विंचू दंश झाला. विंचू चावल्यानंतर पोटात दुखू लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे प्रथोमपचार करून पुढे नारायणगावला आणि नंतर पुण्याला अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी ६:३० वाजता सुलाबाई एरंडे यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी माळशेज घाटात एक कुटुंब फिरायला आले होते. या कुटुंबातील एका २वर्षांच्या मुलाला विंचू दंश झाला होता. या वेळी तत्काळ विंचू दंशावरील लस देऊन इतर तातडीचे उपचार केल्याने या मुलाचा जीव वाचविण्यात यश आले. विंचू चावून प्रकृती गंभीर झाल्याच्या ४ घटना जुन्नर तालुक्यात घडल्या आहेत. मात्र त्यांना वेळीच तातडीचे उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अशी माहिती नारायणगावमधील सर्पदंश व
हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी दिली. (वार्ताहर)