स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू
By admin | Published: March 26, 2017 02:25 AM2017-03-26T02:25:02+5:302017-03-26T02:25:02+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी एका ३८ वर्षीय
पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी एका ३८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे.
लातूर येथील ३८ वर्षीय महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ मार्चला स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. त्या व्यक्तीला कर्करोगाचा आणि न्युमोनियाचा त्रास होता. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी महिन्यापासून १२० रुग्णांची नोंद झाली असून, २० रुग्णांचा मृत्यू झाला. ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या स्वाइन फ्लूचे ३० रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील १२ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे.