स्फोटातील जखमी कामगाराचा मृत्यू
By admin | Published: January 24, 2016 01:59 AM2016-01-24T01:59:47+5:302016-01-24T01:59:47+5:30
कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये ‘क्लीन सायन्स’ या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत मचाले या कामगाराचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये ‘क्लीन सायन्स’ या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत मचाले या कामगाराचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील वाढती असुरक्षितता याबाबत गंभीर स्वरूपात विचार करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अपघातानंतर रुग्णावर करण्यात येणारा खर्च हा जर सुरक्षा उपाययोजनावर करण्यात आला, तर होणाऱ्या अपघातावर नियंत्रण करणे अशक्य होणार नाही; मात्र कंपन्यांच्या प्रशासनाच्या मानसिकतेत बदल हवा. सामान्य कुटुंबातून येणाऱ्या कामगारांच्या व्यक्तींना नुकसानभरपाई मिळणार का व कशा स्वरूपात मिळणार, हा चर्चेचा विषय ठरत आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या बऱ्याच उद्योगांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर घटना रोखणे शक्य होत नाही, तसेच तशा प्रकारच्या उपाययोजना नसतानादेखील कारखाने चालवण्याचा परवाना मिळतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.