मेट्रो कामात कामगाराचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:53+5:302020-12-03T04:19:53+5:30
पुणे : बंडगार्डन रोडवरील मेट्रो स्थानकाचे काम सुरु असताना तोल गेल्याने एका कामगाराचा मृत्यु झाला. कामगाराच्या सुरक्षिततेची काळजी न ...
पुणे : बंडगार्डन रोडवरील मेट्रो स्थानकाचे काम सुरु असताना तोल गेल्याने एका कामगाराचा मृत्यु झाला. कामगाराच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.
अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (वय २३, रा.नागपूर चाळ, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार विनयकुमार ओमप्रकाश सिंग (वय २२,रा.टिंगरेनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रोडवर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी बंडगार्डन मेट्रो स्थानकातील सिमेंटचा खांबावर बसविण्यात आलेले नटबोल्ट काढण्याचे काम सुरू होते. आठ ते दहा मीटर उंचीवर रमाणी काम करत होता. त्यावेळी रमाणीचा तोल जाऊन पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. तपासात कामगार रमाणी याला सुरक्षाविषयक साधने पुरविण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले तसेच तेथे जाळीही बसविण्यात आली नव्हती. त्यानंतर या प्रकरणात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे तपास करत आहेत.
---