व्हेंटिलेटरअभावी तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:54+5:302021-04-24T04:11:54+5:30
मणियार यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरच्या उपचाराची आवश्यकता होती. पहाटे एक वाजेपर्यंत पुणे, नाशिक व ...
मणियार यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरच्या उपचाराची आवश्यकता होती. पहाटे एक वाजेपर्यंत पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात कार्यकर्ते व व्यापाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करूनही एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला नाही. येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरबेड उपलब्ध असूनही त्यांचे संचलन करणारे कर्मचारी नसल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. मणियार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. येथील अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट, बाजारपेठेतील लालबहादूर शास्त्री मित्र मंडळ, जैन श्रावक संघ आदी सेवाभावी संस्थांवर ते कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
खेड तालुक्यात व्हेंटिलेटरबेडसह प्रशिक्षित कर्मचारी आणि डॉक्टर यांची मागणी यावेळी खेड तालुका ग्राहक हक्क समितीचे रवींद्र गुजराथी यांनी केली.