सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायनाच्या दशकपूर्तीचा आनंद निराळा: कौशिकी चक्रवर्ती
By श्रीकिशन काळे | Published: December 17, 2023 09:54 PM2023-12-17T21:54:47+5:302023-12-17T21:55:16+5:30
६९व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायनापूर्वी व्यक्त केल्या भावना
श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव माझ्यासाठी खूप आनंददायी स्वरमंच आहे. याच दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१३ रोजी पहिल्यांदा सवाईत गायले होते. त्यानंतर आज बरोबर दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दहा वर्षांत पुणेकर रसिकांनी मला खूप प्रेम दिले आहे. त्या प्रेमाची पोतडी माझ्याकडे भरून आहे, असेच प्रेम भविष्यातही देत राहा, अशी अपेक्षा शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रविवारी कौशिकी यांनी गायनापुर्वी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझ्यासाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या स्वरमंचावर दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा मी गायले होते. त्यानंतर यंदा १७ डिसेंबर २०२३ रोजी बरोबर दहा वर्षं पूर्ण होतात. त्यामुळे खूप आनंद होत आहे. या दहा वर्षांत मला रसिकांनी खूप प्रेम दिले आहे. पुण्यातील रसिक श्रोते हे वेगळेच आहेत. ते जाणकार आहेत. म्हणून इथे गायन करताना वेगळाच आनंद मिळतो. दहा वर्षांनी मुंबई म्हातारी झाले आहे, त्यामुळे माझी गायकी समजून घ्या आणि असंच प्रेम सतत द्या. भविष्यातही मी आपल्यासाठी गायन करतच राहील. पुण्यात आले की खूप प्रेम मिळते आणि ते प्रेम मी पोतडीमध्ये दरवर्षी भरून नेते, अशा भावना प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केल्या.